कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला प्रवासापेक्षा जास्त आनंद कारने मायलेज जास्त दिल्यावर होतो. भारताची मध्यमवर्गी मानसिकता लक्षात घेऊनच ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भारतात उतरत आहेत. मारुती-सुजुकीसारखी कंपनीही ‘स्वस्तात मस्त’ म्हणजेच कमी पैशात जास्त मायलेज देणारी गाड्या बनवून देते.
आज आम्ही आपल्याला कारचे मायलेज वाढविण्याच्या काही ट्रीक्स सांगणार आहोत. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले तर तुमच्या कारचे मायलेज नक्कीच वाढेल. या ट्रीक्सने जवळपास 10 ते 15% मायलेज नक्कीच वाढेल.
- वारंवार ब्रेक लावल्याने तसेच वेगाने एक्सलरेट घेतल्यास जास्त इंधन लागते. त्यामुळे मायलेज कमी होते. म्हणून सतत ब्रेक लावू नका.
- टायरमध्ये असलेली कमी हवा हे सुद्धा मायलेज कमी होऊ शकते. कार इंधन जास्त लागते. त्यामुळे नेहमी टायर हवा चेक करा.
- गाडी नेहमी एका समान स्पीडने चालवत रहा. वेग खूपच जास्त नसावा. आपण जितक्या वेगाने गाडी चालवू तितके मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे जास्त वेगाने गाडी चालवू नये.
- जर तुम्हाला जास्त मायलेज हवे असेल तर टायरमध्ये Nitrogen हवा भरायला हवी. टायरमध्ये बॅलन्स हवा भरल्याने जवळपास ३ टक्क्यांपर्यंत मायलेजचे कंट्रोल केले जाऊ शकतो.
- कारच्या सर्विसचा गाडीच्या मायलेजवर चांगला परिणाम पडतो. कारची सर्विस केल्यानंतर इंजिन चांगले काम करते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक