Take a fresh look at your lifestyle.

किम जोंग प्रचंड क्रूर; 11 कलाकारांचा ‘असा’ केला खात्मा; मुलींसोबत केले जातेय ‘हे’ कृत्य

दिल्ली :

Advertisement

उत्तर कोरियामध्ये नरकासमान जीवन जगणार्‍या एका महिलेने देशाचा हुकूमशहा किम जोंग-उनच्या क्रूर कृत्यांचा जाहीर पंचनामा केला आहे. प्योंगयांगमधील (Pyongyang) रहिवासी ही योन लिम (Hee Yeon Lim) या 26 वर्षीय मुलीने किमचा पर्दाफाश केला आहे. उत्तर कोरियामधील एका बड्या सैनिक अधिकार्‍याची ती मुलगी आहे. 2015 मध्ये जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी उत्तर कोरियाच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

मृत्युच्या वेळी तिच्या वडिलांचे वय 51 वर्षे होते. तेव्हा त्यांच्याकडे कर्नलची पोस्ट होती. लिम सध्या दक्षिण कोरियामध्ये राहत आहे. या मुलीने सांगितले की, एकदा एका फुटबॉल स्टेडियममध्ये 11 जणांच्या म्युझिकच्या टिमला गोळी घालून ठार मारण्यात आले. कारण या म्युझिक टिमवर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप होता. या टिममध्ये संगीतकार, गायक, वादक अशी मंडळी होती. या टिमला एकाफुटबॉल स्टेडियममध्ये आणले गेले, नंतर त्यांना बांधले आणि एयरक्राफ़्ट बंदूकांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या.

Advertisement

हे दृश्य या 26 वर्षीय मुलीच्या समोर घडले होते. तिने याविषयी बोलताना म्हटले की, ही भयंकर घटना होती आणि त्यानंतर पुढचे तीन दिवस मला जेवणही गेले नाही. हे हत्याकांड पाहिल्यानंतर मी आतून थरथर कापत होते. आमच्याकडे कदाचित पैसा असेल, परंतु ही घटना पाहिल्यानंतर आम्ही सर्व घाबरलो. मी प्योंगयांगमध्ये भयानक गोष्टी पाहिल्या आहेत.

Advertisement

तिने पुढे म्हटले आहे की, उत्तर कोरियामधील दारिद्र्यामुळे लोकांना गवत खाण्यास भाग पाडले जाते. मात्र किम जोंग कधीकधी आपल्या जेवणासाठी 1000 पौंड उडवतात. किम जोंग तीन मुलांचा पिता असूनही शाळेतून अल्पवयीन मुलींना घेऊन जातो, असे या मुलीने सांगितले. या मुलींना या हुकूमशहाची मालिश, मसाज कशी करावी हे शिकवले जाते आणि यापैकी बहुतेक मुलींना किमच्या सेक्स गुलाम बनविले जाते. कोणतीही मुलगी याचा विरोध करणे दूर साधा निषेधही नोंदवू शकत नाही. कारण तिला माहित आहे की निषेधाचा अर्थ म्हणजे थेट मृत्यू. मी शाळेत असतानाही बरेच अधिकारी आमच्या शाळेत यायचे आणि लहान मुलींना घेऊन जायचे.  

Advertisement

या मुलीला कोरियातून बाहेर पडताना खुप त्रास झाला. अनेक ठिकाणी लाच देऊन ती कोरियातून बाहेर पडली. या मुलीने सांगितलेली आपबिती बघता किम हा किती क्रूर आहे, हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply