Take a fresh look at your lifestyle.

म्हणून रोखले UP व उत्तराखंडमधील चक्काजाम; पहा नेमके काय म्हटलेय टिकैत यांनी

दिल्ली :

Advertisement

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शेतकरी आंदोलनास हिंसक गालबोट लागले होते. त्यामुळे उद्या (6 फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाबाबत शेतकऱ्यांच्या संघटनेने काळजी घेतली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यात असे आंदोलन होणार नसल्याचे सांगतानाच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी याचे धक्कादायक कारण स्पष्ट केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, उद्या चक्काजाम दरम्यान काही लोकांनी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. याचा पुरावा हाती आला होता. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने आम्ही उद्या उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशला चक्का जामपासून वेगळे ठेवले आहे.

Advertisement

एकूणच शेतकऱ्यांच्या आंदोलनास गालबोट लावण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेऊन तयारी केल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाल्याकडे टिकैत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी हे कारण दिल्याने अनेकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मात्र, टिकैत यांनी देशभरात शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply