Take a fresh look at your lifestyle.

गावगाड्याची महत्वाची बातमी; गाव नमुना 7 मध्ये होतायेत ‘हे’ 11 बदल, पहा त्याचे फायदे-तोटे

सध्या महाराष्ट्रात 7/12 डिजिटल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यात गावाच्या नमुना 7 यामध्येही बदल करण्याचे काम हाती घेतले जात आहे. यामुळे ग्रामस्थांना आपल्या मिळकतीचा नेमका आणि ठोस माहितीचा उतारा मिळणार आहे, तर महसूल विभाग आणि बँकांना कर्ज प्रकरण करताना सर्च रिपोर्टसाठी यामुळे मदत होईल.

Advertisement

गाव नमुना 7 यामधील महत्वाचे 11 बदल असे :

Advertisement

१. नावासोबत गावाचा स्वतंत्र कोड क्रमांक म्हणजेच लोकल गर्व्हन्मेंट डिरेक्टरी नंबर टाकण्यात येईल.

Advertisement

२. लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र याच्यामध्ये असलेले क्षेत्र स्वतंत्र आणि त्यांची बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद असेल.

Advertisement

३. शेतीक्षेत्रासाठी हेक्टर आर व चौरस मीटर तर अकृषक (एनए) क्षेत्रासाठी चौरस मीटर हे एकक असेल.

Advertisement

४. यापूर्वी खाते क्रमांक इतर हक्क या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच असेल.

Advertisement

५. मृत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवली जात होती. यापुढे अशी माहिती कंसातच परंतु त्यावर एक आडवी रेष मारून दिलेली असेल.

Advertisement

६. प्रलंबित फेरफारांची नोंद इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून राहील.

Advertisement

७. नवीन उताऱ्यात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक असा रकाना असेल, त्यात जुने फेरफार एकत्रित दर्शवले जातील.

Advertisement

८. खातेदार स्पष्टपणे लक्षात यावेत यासाठी दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष राहील.

Advertisement

९. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद असेल.

Advertisement

१०. अकृषक (एनए) सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे एकक आर चौरस मीटर राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कूळ व खंड हे रकाने नसतील.

Advertisement

११. एनए उताऱ्यात शेवटी हे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट सूचना राहील.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply