अहमदाबाद :
राजकारणात सगळ्यांना आपली जागा पक्की हवी असते. त्यासाठी कुटुंब हा निकष खूप अपुरा असतो. कारण, इथे वैयक्तिक गोष्ट कधीही जास्त मोठी असते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंधूंनीही गुजरात भाजपला अडचणीत आणले आहे. त्यांनी बीबीसी माध्यम समूहाला मुलाखत देताना काही महत्वाचे आणि गंभीर प्रश्न केले आहेत.
प्रथम त्यांनी पक्षात होयबा धोरण महत्वाचे असल्याचा घणाघात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, क्रिकेटमध्ये कसलंही योगदान नसताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या चिरंजीवांना बीसीसीआयचे (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) सचिव करून पक्षाने मोदी मदत केली आहे. पक्षपातीपणाचा मुद्दा पुढे करून ते तरुण कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवू इच्छितात. त्यांना फक्त ‘होयबा’ हवे आहेत. हे अगदी स्पष्ट आहे. तर, पक्ष जे काही नियम बनवतं ते पक्षाचे देशभरातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सारखे असतात का?
दुसऱ्या प्रश्नात त्यांनी म्हटले आहे की, आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्र भाईंना आहे. मला वाटतं की फोटोत गर्दी होऊ नये, यासाठी ते असावं. किंवा मग मी घर सोडलं आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांची गरज नाही, असं नरेंद्र भाईंना वाटत असावं आणि त्यामुळे फोटोंमध्ये इतर कुटुंबीय दिसत नसावे. नरेंद्र भाई येतात आणि आईला भेटतात तेव्हा तिथे कुटुंबातलं छोटं मुलही नसतं. हा तुम्हाला अन्याय वाटत नाही का? ते पंकज निवासमध्ये जातात कारण तिथे आई आहे. पण, ते येतात तेव्हा तिथे कुटुंबातलं इतर कुणीच नसतं, असं का?
तिसरा मुद्दा त्यांनी मांडला आहे की, आईशी त्यांचे नातेसंबंध आहेत. इतर कुटुंबीयांशी नाही. तुम्ही जुन्या फोटोंमध्ये बघितलं तर त्यात छोट्या भावाचं कुटुंब दिसतं. पण, गेल्या काही वर्षातले फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यात आईव्यतिरिक्त कुणीच नसतं. जर पक्षाला असं वाटत असेल की आम्ही नरेंद्र मोदी यांचे कुटुंबीय आहोत आणि म्हणून आम्हाला तिकीट मिळत नसेल तर ही पक्षाची भूमिका आहे. ते आईला भेटतात. पण इतर कुटुंबीयांना दूर ठेवण्यात यावं, असे स्पष्ट निर्देश असतात.
त्यांनी मागील कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील घरीही नेले नसल्याचा मुद्दा मांडला आहे. प्रल्हाद मोदी याबाबत सांगतात की, मला वाटतं नरेंद्र भाईंनी घर सोडलं आणि देशालाच घर बनवलं. त्यामुळे आम्ही जरी एकाच कुटुंबातले असलो तरी ते बोलवतील तेव्हाच आम्ही त्यांना भेटू शकतो. नरेंद्र भाई पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या घराचं दार कसं आहे, हे मला स्वतःला माहिती नाही. माझ्या मुलांना कसं माहिती असेल?
नात्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले आहे की, हे नातं वास्तव आहे. ते मिटवलं जाऊ शकत नाही. पण, सोनल मोदीने कधी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी भेट दिली आहे का, हे जर तुम्ही तपासलं तर हे नातं किती घट्ट आहे, याची तुम्हालाच कल्पना येईल. अनेक लोक म्हणतात की आम्ही रामाचे वंशज आहोत, आम्ही त्यांना थांबवू शकतो का?
प्रल्हाद मोदी यांची मुलगी सोनल मोदी यांना बोडकदेव, अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी नुकतेच उमेदवारीसाठीचे निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार 60 वर्षांहून अधिक वय असलेले, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर प्रल्हाद मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून असतो हायवेच्या दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवा; वाचा भन्नाट आणि रंजक माहिती
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…