Take a fresh look at your lifestyle.

क्रॅश टेस्टमध्ये मिळालेत तब्बल 5 स्टार; वाचा, कोणत्या 2 कार ठरल्यात भारतात सर्वात सुरक्षित

दिल्ली :

Advertisement

अनेक कार क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्यावर किंवा काही गाड्यांना अगदी कमी रेटिंग मिळाल्यानंतर भारतीय वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. नंतर अनेक लोकप्रिय झालेल्या गाड्यांही क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्याचे समोर आले. आता अनेक लोक आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली आहेत.  

Advertisement

भारतीय बाजारात ऑटो क्षेत्राची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक कार या सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरल्याचे समोर येत आहे. आता कोणत्या गाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसे उपस्थित करत आहेत. भलेही पैसे जास्त जाऊ द्या पण चांगली रेटिंग असणारी गाडी मिळाली पाहिजे, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत.

Advertisement

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या गाडीच्या सुरक्षिततेचा अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. म्हणूनच आज आम्ही आपल्याला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळालेल्या आणि भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरलेल्या गाड्यांविषयी सांगणार आहोत.

Advertisement
  1. Mahindra XUV300 ही एक दमदार गाडी आहे. 5 स्टार रेटिंग प्राप्त असलेली ही गाडी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हीटेड ओआरव्हीएम, ISOFIX चाईल्ड सीट अँकर, एअरबॅग्ज, ईबीडी, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट पार्किंग सेन्सर, फ्रंट आणि रीअर फॉग लाईट असे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
  2. Tata Altroz या गाडीलाही ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगही मिळाली आहे. यात ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply