Take a fresh look at your lifestyle.

भाजपला पाहिजेत फ़क़्त ‘होयबा’; प्रल्हाद मोदी यांची पक्षावर घणाघाती टीका

अहमदाबाद :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे सध्या आक्रमक मूडमध्ये आहेत. अहमदाबाद येथील निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी मोदींच्या कौटुंबिक वागण्याबद्दल आणि अमित शाह व इतर नेत्यांना वेगळे ट्रीट केल्याचा मुद्दा मांडला आहे. त्यांनी पक्षाला आश्वासक नेतृत्व नकोय, तर होयबा पाहिजेत असा आरोप केला आहे.

Advertisement

बीबीसी माध्यम समूहाने घेतलेल्या मुलाखतीत प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, पक्षपातीपणाचा मुद्दा पुढे करून ते तरुण कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवू इच्छितात. त्यांना फक्त ‘होयबा’ हवे आहेत. हे अगदी स्पष्ट आहे. माझी मुलगी नरेंद्र मोदी यांची पुतणी आहे, म्हणून नव्हे तर एक आश्वासक नेता होण्याची तिची पात्रता असेल आणि विजयाची आशा असेल तर पक्षाने तिला तिकीट द्यायला हवं, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नरेंद्र मोदी यांचे नातवाईक असल्याचा फायदा तिलाही घ्यायचा नाही आणि मलाही नाही.

Advertisement

तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं माझ्या आकलनानुसार क्रिकेटमध्ये कसलंही योगदान नसताना आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात काही कामगिरी बजावल्याचं कुठेही छापून आलेलं नसताना त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाची जबाबदारी देता येते. ते सरकारसाठी उपयोगी आहेत, यासाठी त्यांच्याकडे कोणती पात्रता आहे? आणि तरीही त्यांना भाजपमधून किंवा इतर कुणाकडून सातत्याने पाठिंबा मिळतो आहे. ते जर बीसीसीआयचे (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) सचिव होऊ शकतात तर याचा अर्थ पक्षाचं वागणं दुटप्पी आहे.

Advertisement

भाऊ नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र भाई येतात आणि आईला भेटतात तेव्हा तिथे कुटुंबातलं छोटं मुलही नसतं. हा तुम्हाला अन्याय वाटत नाही का? ते पंकज निवासमध्ये जातात कारण तिथे आई आहे. पण, ते येतात तेव्हा तिथे कुटुंबातलं इतर कुणीच नसतं, असं का? आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्र भाईंना आहे. मला वाटतं की फोटोत गर्दी होऊ नये, यासाठी ते असावं. किंवा मग मी घर सोडलं आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांची गरज नाही, असं नरेंद्र भाईंना वाटत असावं आणि त्यामुळे फोटोंमध्ये इतर कुटुंबीय दिसत नसावे. हे सगळं नरेंद्र भाई काय विचार करतात, यावर आहे. आम्ही कामगार वर्गातले लोक आहोत. आमचा भाऊ आज देशाचा पंतप्रधान झालाय, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. मात्र, आम्ही कधीची काही मिळवण्यासाठी त्यांच्या फोटोचा वापर केलेला नाही आणि भविष्यातही तसं करणार नाही.

Advertisement

एकूणच यामुळे गुजरात भाजपसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे. अशावेळी यातून कोणता तोडगा निघतो याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply