जय शहांच्या मुद्द्यावर मोदींचे बंधू झालेत आक्रमक; पहा नेमका काय प्रश्न केलाय त्यांनी ते
अहमदाबाद :
भाजपच्या अटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणी सोनल प्रल्हाद मोदी ओबीसींसाठी राखीव अहमदाबादमधल्या बोडकदेवमधून निवडणूक लढवू इच्छितात. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे मोदींचे भाऊ प्रल्हाद यांनी भाजपला अडचणीचे प्रश्न केले आहेत.
बीबीसी माध्यम समूहाने प्रल्हाद मोदी यांची याबाबत सविस्तर मुलाखत घेतली आहे. बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी प्रल्हाद मोदींची मुलाखत घेतली आहे. त्यात प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, पक्ष जे काही नियम बनवतं ते पक्षाचे देशभरातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सारखे असतात. मात्र, भाजपमध्ये तसेही काहीच दिसत नाही. रेशन कार्डसाठीचे नियम केंद्र सरकारने बनवले आहेत आणि ते पाळले जातात. पक्षानेही त्यांचं पालन करायला हवं. आमच्या शिधापत्रिकामध्ये नरेंद्रभाई यांचे नाव नाही.
त्यांनी पुढे पक्षाला अडचणीत टाकणारे दाखले दिले आहेत. प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र भाई पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या घराचं दार कसं आहे, हे मला स्वतःला माहिती नाही. माझ्या मुलांना कसं माहिती असेल? ते आईला भेटतात. पण इतर कुटुंबीयांना दूर ठेवण्यात यावं, असे स्पष्ट निर्देश असतात. आईशी त्यांचे नातेसंबंध आहेत. इतर कुटुंबीयांशी नाही. तुम्ही जुन्या फोटोंमध्ये बघितलं तर त्यात छोट्या भावाचं कुटुंब दिसतं. पण, गेल्या काही वर्षातले फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यात आईव्यतिरिक्त कुणीच नसतं. जर पक्षाला असं वाटत असेल की आम्ही नरेंद्र मोदी यांचे कुटुंबीय आहोत आणि म्हणून आम्हाला तिकीट मिळत नसेल तर ही पक्षाची भूमिका आहे.
तसेच गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्याबद्दलही प्रल्हाद मोदी बोलले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पक्ष जे काही नियम बनवतं ते पक्षाचे देशभरातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सारखे असतात.
राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील वर्गीयजी यांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं माझ्या आकलनानुसार क्रिकेटमध्ये कसलंही योगदान नसताना आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात काही कामगिरी बजावल्याचं कुठेही छापून आलेलं नसताना त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाची जबाबदारी देता येते. ते सरकारसाठी उपयोगी आहेत, यासाठी त्यांच्याकडे कोणती पात्रता आहे? आणि तरीही त्यांना भाजपमधून किंवा इतर कुणाकडून सातत्याने पाठिंबा मिळतो आहे. ते जर बीसीसीआयचे (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) सचिव होऊ शकतात तर याचा अर्थ पक्षाचं वागणं दुटप्पी आहे. अमित शहांचे चिरंजीव जय शहा बीबीसीआयचे सचिव आहेत आणि नुकतीच त्यांची एशियन क्रिकेट काउंसिलच्या प्रमुखपदी वर्णी लागली आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट