दिल्ली :
सध्या लोक स्वस्तात मस्त गाडी शोधण्यास प्राधान्य देत आहेत. मारुती- सुजुकी ही ऑटो क्षेत्रातील बडी कंपनी आहे. ही कंपनी नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीयांची मानसिकता ओळखून गाडी बनवते. कमी पैशात जास्तीत जास्त मायलेज देणार्या गाड्या तयार करण्यासाठी मारुती सुजुकी प्रसिद्ध आहे.
भारतीयांच्या पसंतीस उतरलेली आणि अनेक सामान्य भारतीयांची ड्रीम कार असलेली मारुती सुजुकी अल्टो या गाडीला आता 20 वर्षे पूर्ण होत आहेत. 2020 पासून आजवर अनेक भारतीयांच्या मनाला या कारने भुरळ घातली. या गाडीचे सर्वच व्हेरियंट जास्त मायलेज देतात. आजही या गाडीची ओळख मायलेजसाठीच आहे. अल्टोची सुरुवातीची किंमत २.९९ लाख रुपये आहे.
असे आहेत फीचर्स :-
- पॉवर साठी ७९६ सीसी, ३ सिलिंडर, १२ वॉल्व, बीएस६ कम्प्लायन्टचे इंजिन
- इंजिन ६००० आरपीएमवर ४८ पीएसचे मॅक्सिमम पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ६९ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.
- अल्टोचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये :-
- २००४ मध्ये देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार बनली होती.
- गेल्या १६ वर्षापासून बेस्ट सेलिंगचा किताब आपल्या नावावर या कारने केला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी
- तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय