मोदींच्या पुतणीला उमेदवारी डावलली; मोदींच्या भावांनी पक्षाला केले मग ‘ते’ अडचणीचे प्रश्न
अहमदाबाद :
60 वर्षांहून अधिक वय असलेले, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नाही या अटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणी सोनल प्रल्हाद मोदी यांना उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे मोदींचे भाऊ प्रल्हाद यांनी भाजपला अडचणीचे प्रश्न केले आहेत.
बीबीसी माध्यम समूहाने प्रल्हाद मोदी यांची याबाबत सविस्तर मुलाखत घेतली आहे. बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी प्रल्हाद मोदींची मुलाखत घेतली आहे. त्यात प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी ओबीसींसाठी राखीव अहमदाबादमधल्या बोडकदेवमधून निवडणूक लढवू इच्छिते. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आपला उदरनिर्वाह करत नाही. आम्ही सगळे मेहनत करून कमावतो आणि त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. माझं किराणा मालाचं दुकान आहे.
इतके सगळे सांगतानाच त्यांनी पुढे म्हटले आहे की, नरेंद्र भाई येतात आणि आईला भेटतात तेव्हा तिथे कुटुंबातलं छोटं मुलही नसतं. हा तुम्हाला अन्याय वाटत नाही का? ते पंकज निवासमध्ये जातात कारण तिथे आई आहे. पण, ते येतात तेव्हा तिथे कुटुंबातलं इतर कुणीच नसतं, असं का? आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्र भाईंना आहे. मला वाटतं की फोटोत गर्दी होऊ नये, यासाठी ते असावं. किंवा मग मी घर सोडलं आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांची गरज नाही, असं नरेंद्र भाईंना वाटत असावं आणि त्यामुळे फोटोंमध्ये इतर कुटुंबीय दिसत नसावे.
एकूणच प्रल्हाद मोदी यांनी नरेंद्र मोदी आणि कुटुंबीय यांच्यातील नात्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करूनच उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आता भाजप किंवा खुद्द पंतप्रधान मोदी यावर कोणती प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक