दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात 72 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. सरकार आणि आंदोलक शेतकरी अशा दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने अडून आहेत. त्यातच शेतकऱ्यांनी शनिवारी 6 फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी काही सूचना दिलेल्या आहेत.
टिकैत यांनी म्हटले आहे की, देशभरातील शेतकरी कायद्यांना असलेला आपला विरोध शांततामय पद्धतीने करतील. कुठेही हिंसक घडामोडी घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसर आणि उत्तरप्रदेश व उत्तराखंड या तिन्ही राज्यांमध्ये चक्काजाम आंदोलन होणार नाही.
दरम्यान, एका आंदोलकाने हरीभूमी वृत्तपत्रास सांगितले आहे की, ज्या प्रकारे सरकारने रस्त्यावरील अडथळे काढून टाकले त्याच पद्धतीने ते कायदा देखील मागे घेतील. भारतीय किसान युनियन युवकचे जिल्हाध्यक्ष विभोर शर्मा यांनी सांगितले आहे की, चक्का जामच्या दृष्टीने त्यांच्या संघटनेने पूर्ण तयारी केली आहे. गौतमबुद्ध नगरातील विविध ठिकाणी संघटनेचे चक्काजाम आंदोलन होणार आहे.
दरम्यान, राकेश टिकैत यांनी पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणीय कार्यकर्ते ग्रेटा थानबर्ग यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी चळवळीला पाठिंबा दिल्याचे स्वागत केले आहे. दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर असलेल्या गाजीपुर येथील आंदोलनाची जागतिक पातळीवर चर्चा सुरू असल्याबद्दल त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कोण आहेत हे आम्हीही ओळखत नाहीत. मात्र, त्यांच्या पाठिंब्याचे आंदोलक स्वागत करतात.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक