Take a fresh look at your lifestyle.

माध्यम संस्थांसाठी गुड न्यूज; गुगलची माघार, ‘तिथल्या’ पत्रकारांना येणार अच्छे दिन..!

गुगल आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यातील वादातून अखेर गुगलला माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे आता बातम्या दाखवण्यासाठी गुगलला पत्रकार किंवा माध्यम संस्थांना पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार मानण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

अखेर गुगलने ऑस्ट्रेलियन मीडिया संस्थांना बातम्यांसाठी पैसे देण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेतील या बहुराष्ट्रीय टेक्नोलॉजी कंपनीने शुक्रवारी न्यूज शोकेस नावाचे एक प्लॅटफॉर्म लॉन्च केले. त्याद्वारे बातम्यांसाठी पैसे दिले जाणार आहेत. गुगलने यापूर्वी ऑस्ट्रेलियन सरकारच्या मीडिया संस्थांना पैसे देण्याच्या कायद्यास विरोध केला होता. तथापि, आता कॅनबेरा टाईम्ससह सात मीडिया संस्थांशी व्यवहार करून या वृत्तासाठी पैसे देण्याचे मान्य केले आहे.

Advertisement

मागील वर्षी जूनमध्ये ब्राझील आणि जर्मनी या देशात न्यूज शोकेस सुरू झाले होते होते. मात्र, अल्फाबेट इंकच्या मालकीच्या गुगलने ऑस्ट्रेलियामध्ये असे सुरू केले नव्हते. मात्र, आता ऑस्ट्रेलिया देशात याची सुरुवात होत आहे. फेसबुकलाही ऑस्ट्रेलिया सरकारने असाच आदेश दिला आहे. ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारात गुगलचा वाटा 53 आणि फेसबुकचा 23 टक्के आहे. हा कायदा न पाळल्यास दोन्ही कंपन्यांना भारी दंड आकारण्याची तरतूदही ऑस्ट्रेलियन कायद्यात आहे.

Advertisement

गुगलने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारला धमकी दिली होती की, स्थानिक वृत प्रकाशकांना बातम्यांसाठी पैसे देण्यास भाग पाडल्यास गुगल सर्च इंजिन सेवा ऑस्ट्रेलियात बंद केली जाईल. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी धमक्यांना प्रतिसाद न देतानाच ऑस्ट्रेलियन सरकार कोणत्याही किंमतीत या कायद्यापासून मागे हटणार नाही असे स्पष्ट संकेत गुगलला दिले होते. त्यामुळे अखेरीस गुगलने माघार घेतली आहे. आता फेसबुक यावर काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply