Take a fresh look at your lifestyle.

हे अस्सल पुणेरी जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

 1. पितृपक्ष स्पेशल..

  एक छोटीशी मुलगी आजीला विचारते:
  “आजी, रोज आपल्या घरी एक बाई आणि माणूस रात्री एकत्र येतात आणि सकाळी गायब होतात…
  ते कोण आहेत??

  आजी- “हे ईश्वरा, तू त्यांना बघितलंस वाटतं…
  .
  .
  .
  ते दोघं तुझे आई बाबा आहेत….
  .
  जे खूप वर्षांपासून ……
  .
  .
  .
  हिंजवडीत जॉब करतात.
 2. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत.

  नंतर तक्रार चालणार नाही.
  (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज) 
 3. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये.

  हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. 
 4. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे.

  तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. 
 5. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील.

  नंतर ज्यादा आकार पडेल. 
 6. सैराट पिक्चर बघून गण्या घरी गेला…

  घरी जाऊन बघतो तर, मेव्हणा चहा पीत बसलेला होता…
  गण्या दारातूनच पळून गेला.
 7. शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

  पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

  तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

  मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो ………….
  .
  .
  .
  .
  मुख्य प्रवेशद्वार.
 8. एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.

  वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
  पण काहीच उपयोग झाला नाही.

  शेवटी तो बॉसला म्हणाला,
  “हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत
  तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून.”
 9. संगणक अभियंता असलेल्या नवरा बायको मध्ये आपल्या मुलांसमोर वाद होत असतो.
  नवरा : अग्ग माझे फक्त तुझ्यावरच प्रेम आहे.

  बायको : छे, तुम्ही माझ्यावर कधीच मनापासून प्रेम केले नाही.

  नवरा : (मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन )
  मग यांना काय मी गुगलवर सर्च करून आणलेत काय ?
 10. मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत
  पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.

  ‘उभं रहा आणि जरा बोलायला शिक’

  आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,

  ‘खाली बस आणि जरा ऐकायला शिक’

Advertisement

Leave a Reply