Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसचा मोठा निर्णय; महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘त्यांची’ झाली निवड, वाचा काय आहे कारण

मुंबई :

Advertisement

सध्या काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याऐवजी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

Advertisement

महाराष्ट्र काँग्रेसला सध्या आक्रमक तसेच सध्या ओबीसी मतदार केन्द्रित चेहर्‍याची गरज असल्याने काँग्रेस हायकमांडने नाना पाटोले यांची निवड केली आहे. नाना पटोलेंनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंच्या रुपानं महाराष्ट्र काँग्रेसला आक्रमक चेहरा मिळाला आहे. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते.

Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समोर आला नव्हता. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ आल्याचे बोलले जात होते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply