Take a fresh look at your lifestyle.

आजही पेट्रोलच भडका; वाचा, संपूर्ण वर्षात किती झाली भाववाढ, अजून किती वाढू शकतात दर

दिल्ली : 

Advertisement

सर्वसामान्यांच्या खिशाला आजही झटका बसलेला आहे. अजूनही सामान्य माणसांची आर्थिक घडी बसलेली नसताना पेट्रोल आणि डिझेलची महागाई वाढतच आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा  पेट्रोल आणि डिझेल महाग केले आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन जेमतेम चार दिवस होत नाहीत तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ३५ पैशांची वाढ झाल्याची नोंद आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील वाढीची झळ सर्वसामान्यांना पोहोचत आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे.

Advertisement

दिल्ली, मुंबईसह सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर निरंतर वाढले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. जेव्हा इंधनाचे दर वाढतात, तेव्हा महागाई देखील वाढते. त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो. महाग तेलामुळे वाहतुकीची किंमत वाढते, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतात.

Advertisement

तज्ञांच्या माहितीप्रमाणे, अजूनही इंधनाच्या किमती वाढू शकतात. संपूर्ण वर्षात हळूहळू जवळपास 15 रुपयांची वाढ झाली आहे. लॉकडाउनपासून इंधनाच्या दरात सुरू झालेली दरवाढ अजूनही थांबेलली नाही.

Advertisement

अशा आहेत किमती :-

Advertisement
अ.क्र.शहरपेट्रोल (प्रतिलिटर)डिझेल (प्रतिलिटर)
1मुंबई९३.२० रुपये८३.६७ रुपये
2नवी दिल्ली८६.६५ रुपये७६.८३ रुपये
3कोलकाता८८.०१ रुपये८०.४१ रुपये
4चेन्नई८९.१३ रुपये८२.०४ रुपये

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply