आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले अत्यंत महत्वाचे विधान
मुंबई :
सध्या काँग्रेसमध्ये राज्य पातळीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याऐवजी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते.
आता अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते व दिल्लीत वजन असणारे नेते म्हणून ओळख असणारे माणिकराव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे. ‘राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे समान सरकार आहे. त्यामुळे सभापतीपद हे काँग्रेसकडेच आहे. त्यामध्ये दोन्ही पक्ष सहकार्य करत आहे. सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’ अशी मागणीच ठाकरे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी एक मोठा खुलासाही केलेला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं. मात्र शेवटी उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सभापतीपद काँग्रेसला देण्यात आले होते. समसमान कार्यक्रमावर सरकार आहे आणि सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!