Take a fresh look at your lifestyle.

भारतीय ऑटो क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय झालेली ‘ती’ कार झाली सुरक्षेच्या बाबतीत फेल; वाचा, क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाले रेटिंग

दिल्ली :

Advertisement

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. आता लोकांना मारुती सुझुकीच्या कोणत्या कारला किती रेटिंग आहे, याची माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच सर्वच चारचाकी वापरणारे ग्राहक काळजीपोटीही आपापल्या गाड्यांचे रेटिंग शोधत आहेत. अशातच भारतीयांची पसंत ठरलेली आणि अनेक रेकॉर्ड केलेली एक कार सुरक्षेच्याबाबतीत मागे पडली आहे.   

Advertisement

ग्लोबल एनकॅप (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. स्विफ्ट 2020 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. 2020 मध्ये या कारच्या 1,60,700 युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात स्विफ्टची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरली आहे.

Advertisement

आता कोणत्या गाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसे उपस्थित करत आहेत. भलेही पैसे जास्त जाऊ द्या पण चांगली रेटिंग असणारी गाडी मिळाली पाहिजे, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत.

Advertisement

जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. अशीच काहीशी गत स्विफ्टची झाली आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply