Take a fresh look at your lifestyle.

भारतीयांच्या मनावर गरुड असलेल्या ‘त्या’ गाडीत आली खराबी; कंपनीने ‘एवढ्या’ गाड्या मागवल्या परत

दिल्ली :

Advertisement

एकेकाळी आमदारापासून ते पोलिसापर्यंत तर आजच्या घडीला तरुणाई ज्या गाडीच्या प्रचंड प्रेमात आहे अशी ‘महिंद्रा थार’. काही दिवसांपूर्वी या गाडीचे नवीन व्हेरियंट लॉंच करण्यात आले होते. आता मात्र महिंद्रा थारच्या काही गाड्यांमध्ये बिघाड असल्याची घटना समोर आली आहे. ज्या गाड्यांमध्ये खराबी असल्याचे समोर आले आहे त्या सर्व गाड्या सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत बनवण्यात आल्या होत्या.

Advertisement

महिंद्रा एका कंपनीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकदा स्पलायर प्लांट कडून मशीन सेटिंग मध्ये काही तरी गडबड झाल्यामुळे या गाड्यांना नुकसान झाले असू शकते. कंपनीचे डीलर या गाड्या मालकांशी संपर्क करतील. याशिवाय, खराब पार्ट बदलण्याचा खर्च कंपनी करणार आहे.

Advertisement

महिंद्रा थार या गाडीला ऑफरोड साठी ओळखले जाते. आजही कित्येक वर्षानंतर या गाडीचे गारुड लोकांवर कायम आहे. महिंद्रा थारच्या डिझेल मॉडलच्या १५७७ युनिट्स परत (रिकॉल) मागवल्या आहेत. आधी ही गाडी खूपच कमी रंगात उपलब्ध होती. आता मात्र महिंद्रा थार सहा रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. यात मिस्टिक कॉपर, रेड रेज, नेपोली ब्लॅक, एक्वामरीन, गॅलेक्सी ग्रे आणि रॉकी बेज चा समावेश आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply