‘त्या’ देशहिताच्या प्रकल्पासाठी टाटा-रिलायंस-महिंद्रा येणार एकत्र; मोदी सरकारला होणार मदत
अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केलेली आहे. या मिशनद्वारे हायड्रोजनचा ग्रीन एनर्जीच्या रूपात वापर करण्याची कल्पना सत्यात उतरवली जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी टाटा-रिलायंस-महिंद्रा या तिन्ही उद्योग संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
टाटा, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यासह यात केंद्र सरकारची इंडियन ऑइल कंपनी सोबत काम करण्याची शक्यता आहे. हायड्रोजनसारख्या तत्त्वास ग्रीन एनर्जी स्रोताच्या रूपात वापर करणे एकट्या सरकारच्या आवाक्यातील काम नाही. हाय फ्युएल इफिशियन्सीमुळे याचा उपयोग रॉकेटच्या इंधनाच्या रूपातही होतो. तसेच हे अतिशीघ्र ज्वलनशील असल्याने थेट स्फोटक श्रेणीत याचा उल्लेख केला जाते. त्यासाठी खासगी क्षेत्रालाही भागीदारी देणे आवश्यक आहे.
हायड्रोजन ऊर्जा मिशनच्या माध्यमातून भारताची योजना ग्रीन एनर्जी स्रोताला प्रोत्साहन देणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करणे असे धोरण ठरवलेले आहे. हायड्रोजन एक खूप स्वच्छ, प्रदूषणरहित व परवडणारा ऊर्जास्रोत आहे. याच्या ज्वलनानंतर फ़क़्त पाणी राहते. मात्र, हे ज्वलनशील असल्याने ऊर्जा क्षेत्रात हायड्रोजनला व्यावहारिक बनवण्यासाठी भारताला तंत्रज्ञानावर खूप खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी अगोदरपासूनच खासगी क्षेत्राचे सहकार्य घेतले जात आहे.
तसेच हे इंधन म्हणून वापरण्यास सुरुवात झाल्यावर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांसाठी देशात मोठ्या प्रमाणात इंधन स्टेशन्स तयार करण्याची गरज लागणार आहे. हायड्रोजन कौन्सिल किंवा युरोपियन हायड्रोजन आघाडीप्रमाणे भारतातही आता यावर काम सुरू झालेले आहे. हायड्रोजन भविष्याचे इंधन असल्याचे टुटू धवन (वाहनतज्ज्ञ) यांनी म्हटले आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक