Take a fresh look at your lifestyle.

शेतीकथा : डाळिंब उत्पादकांची शोकांतिका; बाजारभाव जास्त, मात्र मालच नाही मस्त..!

अहमदनगर :

Advertisement

कोरडवाहू शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून देण्याचे स्वप्न दाखवण्याचे काम खऱ्या अर्थाने डाळिंब या फळपिकाने केले. मात्र, तेल्या रोगाच्या संकटासह हवामान बदल आणि बाजारात मिळणारे अपुरे भाव यामुळे डाळिंब उत्पादक विवंचनेत आहेत. आताही बाजारात दमदार भाव असताना झाडांना फळ जास्त नसल्याने मोठा नफा यातून मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे.

Advertisement

भारतातील शेती सध्या समस्याग्रस्त आहे. रास्त भाव मिळत नसतानाच ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणामही शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. सध्या डाळिंब उत्पादक याच फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे काहींना लॉटरी लागून गडगंज पैसे मिळत आहेत. त्यांच्या यशकथा वृत्तपत्र आणि टीव्हीवर झळकत आहेत. तर, बहुसंख्य डाळींब उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत.

Advertisement

एकतर या फळपिकासाठी गुंतवणूक मोठी आहे. त्यातच लहरी हवामानाचा फटका बसत आहे. आताही ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सुमारे 80 टक्के इतकी मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. परिणामी बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी घाऊक बाजारात ३२०० ते ३५०० रुपये प्रतिक्रेट (२० किलो) पर्यंत गेले आहेत. तर, किरकोळ बाजारात २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका दमदार भाव चांगल्या डाळिंब फळाला मिळत आहे. वर्षभरापूर्वी बाजारात घाऊकला १३००-२००० रुपये प्रतिक्रेट तर किरकोळ विक्रीला १०० ते १५० रुपये प्रतिकिलो भाव होता. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या दुप्पट भाव आहेत.

Advertisement

मात्र, यंदा या सीजनमध्ये माल खूप कमी आल्याने भाववाढीचा म्हणावा असा फायदा बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेला नाही. बाजारातील हे मोठे आकडे पाहून अनेकांना आता डाळिंब उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे वाटत असतानाच, उत्पादक मात्र दुर्दैवाने विवंचनेत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply