Take a fresh look at your lifestyle.

द्राक्ष निर्यातीसाठी ४२ हजार हेक्टर क्षेत्र सज्ज; पहा कोणाचा आहे सर्वाधिक वाटा

एकूण भारताचा विचार केल्यास द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्रामध्ये नाशिकचा वाटा खूप मोठा आहे. यंदाही महाराष्ट्रातून तब्बल ४२ हजार ७७२ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. त्याद्वारे ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी तयार झालेले आहेत.

Advertisement

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ग्रेपनेट यावर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. निर्यातीसाठी आवश्यक असलेला दर्जा, त्यातील रासायनिक खतांची व घटकांची मात्रा, फवारणीसाठी लागणारे औषधांची मात्रा त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन कृषी विभाग व खासगी कंपन्या आणि सल्लागार करतात.  २० डिसेंबर २०२० पर्यंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची निर्यातीसाठी नोंदणी करण्यात आली. त्यात या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Advertisement

एकूण निर्यातीमधील नाशिक जिल्ह्याचा वाटा तब्बल ९० टक्के आहे. सांगली, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, जालना व बीड या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनीही यासाठी नोंदणी केली आहे. निर्यातदारांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ३५ हजार ७३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Advertisement

निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक, येवला, सिन्नर, बागलान, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, नांदगाव,  तासगाव, खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ, जत, वाळवा, आटपाडी, कडेगाव, जुन्नर, इंदापूर, आंबेगाव, दौंड, बारामती, शिरूर, पुरंदर आदि जिल्ह्यांचा यामधील वाटा जास्त आहे. या भागातील शेतकरी तुलनेने पुढारलेले समजले जात असल्याचे वास्तव आहे. मात्र, महत्वाचे म्हणजे या भागात पाणी मुबलक आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply