जगातील सर्वात महागडी भाजी पिकवली जातेय बिहारमध्ये; किलोसाठी मोजावे लागताहेत 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण विषय
शेती व्यवसायाचे एक बेसिक तंत्र आहे. आजच्या काळात शेतकर्याला तरायचे असल्यास नवीन युगानुसार शेती करणे भाग आहे. तसेच ज्या भाजी किंवा धान्याला मागणी आहे, त्याचीच आधुनिक पद्धतीने लागवड करून पैसे कमवने शक्य आहे. कारण याच धर्तीवर बिहारमध्ये जगातील सर्वात महागड्या भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. त्याची किंमत प्रति किलो सुमारे 1 लाख रुपये आहे.
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात राहणारे शेतकरी अमरेश कुमार सिंह हे आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. वाराणसीच्या भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राचे कृषी वैज्ञानिक डॉ. लाल यांच्या देखरेखीखाली ते 5 एकर जागेवर ही भाजीची लागवड करण्यात आली आहे. ही भाजी 2 महिन्यांपूर्वी लावण्यात आली होती, जी आता हळूहळू वाढत आहे.
बिहार राज्याच्या कृषी विभागानेही या भाजीची लागवड करण्यासाठी अमरेश यांची साथ देण्याचे ठरवले आहे. जर आमरेश यांना यश आले तर बिहारच्या शेतकर्यांची स्थिती खूप सुधारू शकते. ते अपेक्षेपेक्षा अधिक कमावू शकतात. औरंगाबादच्या नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावात जेव्हा अमरेशने या भाजीची लागवड करण्यास सुरवात केली, तेव्हा ते काय पेरत आहेत हे लोकांना समजले नाही. याविषयी लोकांचे अनेक प्रश्न होते.
हॉप शूट्स एंटीबॉयोटिक औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. त्याची फुले बिअर तयार करण्यासाठी वापरली जातात. तसेच काही तज्ञ म्हणतात की, टीबीसाठी बनविलेले औषधात याचा उपयोग होऊ शकतो. हॉप शूट ही भाजी जेवण बनविण्याकरता वापरली जाऊ शकते. या भजीचे लोणचे देखील बनवले जाते, जे खूप महाग आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स