Take a fresh look at your lifestyle.

राणे म्हणतात, ‘आली..रे..आली..पुन्हा..ती वेळ आली..’; काँग्रेसच्या हक्काबाबत केले महत्वाचे विधान

मुंबई :

Advertisement

भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस व राष्ट्रवादी यांना दिवचाण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही त्यांनी टोमणा हाणला आहे. तर कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री हे मिळण्याचा हक्क असल्याचे राणेंनी म्हटले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.’ 

Advertisement

एकूणच भाजप सध्या महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही मुद्द्यावर काडीमोड होण्यासाठीची संधी शोधत आहे. उपमुख्यमंत्री या पदावरून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात काहीही विसंवाद झाल्यास पुन्हा एकदा सत्तासोपान चढण्याची संधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शोधत आहेत. त्याला इतर नेते मदत करण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यात महाविकास आघाडीत संवाद कमी होण्याची शक्यताही वेळोवेळी व्यक्त होत आहे. हाच धागा राणेंनी पकडला आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply