Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोलेंच्या जागी येणार कोण?; उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेचीत तिघेजण..!

मुंबई :

Advertisement

राज्यात ‘मी पुन्हा येणार’च्या घोषणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असतानाच महाविकास आघाडी सरकार आणखी एकत्र येत असल्याचा संदेश मिळत आहे. त्यानुसार आता आघाडीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री हे पद मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देऊन पहिले पाउल उचलले आहे.

Advertisement

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदाचीही मागणी केल्याने काँग्रेस पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोणाचे मंत्रिपद काढून घेणार ही समस्या पक्षासमोर होती. त्यामुळे आता पटोलेंकडील विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देऊन त्या बदल्यात काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा तोडगा समोर आला आहे. शिवसेनेनेही त्याला मान्यता दिली असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

अशावेळी उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. तर, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनीही चाचपणी सुरू केली आहे. मात्र, एक सौम्य आणि समजंस नेता म्हणून अखेरीस हे पद थोरात यांच्याकडे येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply