Take a fresh look at your lifestyle.

मोदींची कमाल; त्यामुळे ट्रॅक्टरवाल्यांना येणार अच्छे दिन..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक महत्वाची घडामोड म्हणजे त्यांनी पेट्रोल आणि डीझेल या दोन्ही इंधानांना एकाच समान पातळीवर आणण्याचा अट्टाहास केला. परिणामी डिझेलच्या भावात ‘क्रांतिकारी’ बदल झालेले आहेत. त्याच क्रांतिकारी निर्णयाचा फटका आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तर, नाईलाजाने का होईना ट्रॅक्टरवाल्यांना भाववाढीचे अच्छे दिन अनुभवास मिळणार आहेत.

Advertisement

याप्रकरणी आता मुदखेड तालुका ट्रॅक्टर मालक व चालक संघटना यांची एक इमेज सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात व्हायरल होत आहे. त्यात डीझेल या इंधनाच्या भाववाढीमुळे व जीएसटी करामुळे शेतीच्या मशागतीचे भाव वाढल्याचे म्हटलेले आहे. अर्थात महाराष्ट्र राज्यभरात इतकीच वाढ झालेली आहे असेही नाही. मात्र, एकूण दोन्हीमुळे यंदा शेतकऱ्यांना मशागतीच्या खर्चासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत हेही स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

या दरपत्रकात एकूण सुमारे २५ ते ४० टक्के इतकी भाववाढ झाल्याचे दिसत आहे. एकूणच मागील काही कालावधीत वाढत जाणारा जीएसटी आणि डीझेल या इंधनाचे वाढणारे भाव लक्षात घेता भाववाढ अपेक्षित होती. मात्र, यामुळे शेतीचा एकूण उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यात उत्पादन आणि शेतमालाचे भाव न वाढल्यास शेतकऱ्यांना नफा मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Advertisement

https://www.facebook.com/photo?fbid=3497877687104094&set=a.2134542966770913

Advertisement

मुदखेड तालुका ट्रॅक्टर मालक व चालक संघटना यांचे दरपत्रक असे :

Advertisement
मशागत प्रकारखर्च (रुपये / एकर)
नांगरणी२५००
हरभरा वावर नांगरणी२८००
रोटर मारणे२५००
केळीच्या शेतात रोटर मारणे२८००
सरी / बेड करणे१५००
पेरणी१५००
डंपिंग भाडे८००

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply