Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांच्या’ विरोधात क्रिकेटपटू व बॉलीवूड रिंगणात; सरकारला मिळतोय जोरात पाठींबा

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी अशा कृषी सुधारणा विधेयकामुळे देशात कॉर्पोरेट महादलाल तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन केले आहे. त्या आंदोलनावर जगभरातील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलीवूड सेलिब्रिटी यांनी एकसुरात सरकारला पाठींबा दिला आहे.

Advertisement

(1) Amitabh Bachchan on Twitter: “T 3803 – “तर्क का जवाब तो तर्क में दिया जा सकता है पर विश्वास का जवाब तर्क के पास नहीं है। ” ~ Ef ViBa you can give an answer to an argument with an argument ; but an answer to trust does not lie with argument” / Twitter

Advertisement

केंद्र सरकारच्या वादग्रस्त शेती कायद्याच्या विरोधात शेतकरी 70 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यावर रिहाना, मिया खलिफा, मीना हॅरिस आणि ग्रेटा थनबर्ग या आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. परिणामी हे आंदोलन पुन्हा जागतिकदृष्ट्या चर्चेत आले आहे. यानंतर मोदींचा चाहता असेलल्या अक्षय कुमार यांच्यासह सुनील शेट्टी, अजय देवगण, कंगना रनौत, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यासारख्या लोकांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट करून हा भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणून याचे वर्णन केले आहे.

Advertisement

(1) Krushirang on Twitter: “डिलीट केलेलं ट्विट वाचा की..” / Twitter

Advertisement

अगदी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही यावर कडेकडेने सरकारला पाठींबा देणारे ट्विट केले आहे. बच्चन यांनी तर्क का जवाब तो तर्क में दिया जा सकता है पर विश्वास का जवाब तर्क के पास नहीं है असे म्हटले आहे. त्यावर अनेकांनी म्हटले आहे की, थेट ट्विटरवर शेतकऱ्यांच्या विरोधात आणि मोदी सरकारच्या विरोधात पोस्ट करून टाका. इतरांनी केलेच आहे तर मग आपण का मागे राहता.

Advertisement

Yuvraj Singh on Twitter: “As proud citizens of our beloved India, let’s stand united in this hour of crisis. There is no problem that cannot be resolved. Our farmer community is the lifeblood of this nation and I am confident that a peaceful resolution will be reached soon 🇮🇳 #IndiaTogether” / Twitter

Advertisement

दरम्यान, पत्रकार राजू परुळेकर यांनी क्रिकेटपटू संदीप शर्मा यांनी केलेले वेगळे ट्विट आणि नंतर ते डिलीट केल्याचा संदर्भ देणारे ट्विट केले आहे. एकूणच देशात एकसुरी आवाजात सरकारच्या बाजूने काही घटक सक्रीय असल्याची शंका यानिमित्ताने अनेकांनी पुन्हा एकदा उपस्थित केली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा मध्यम मार्गाने काहीही न बोलणारे क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकार एकाचवेळी सरकारच्या बाजूने बोलण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Mohammed Zubair on Twitter: “@YUVSTRONG12 Amicable* ki jagah Peaceful likh diye Yuvi bhai. Sahi hai… https://t.co/Nk8Pu0NkR2” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply