Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेले हे जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

 1. सर: सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला?

  रम्या: औरंगाबाद
  सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं…
  रम्या थोडा विचार करतो
  आणि म्हणतो “नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला….”
 2. शिक्षक: “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर….

  हऱ्या: इंग्रजी गेलं XXXX…. तू हात तरी लाऊन बघ !
 3. परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो….

  चिटीँग पण करता येत नसते.

  शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
  परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.

  परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
  आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

  गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले
  यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

  गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….”
 4. सर – किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?

  तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
  आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????

  . गण्या- सर , मी हसत आहे कारण
  उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त,
  तर मग हे ५ गुण आले कुठुन
 5. शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.

  विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’

  एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.

  ‘यालाच म्हणतात आळस.’
 6.  बाई: काय रे गण्या, Homework नाही केलास?

  गण्या: काल रविवार होता, Homework आठवलाच नाही.
  बाई: फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला.

  गण्या:(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला ‘लाईक’ केलेलं दिसतय वाटत.
 7. मास्तर: कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?

  विद्यार्थी: सोप्प आहे सर ..,

  प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते…आणी शेवट वाइन शॉप मध्ये … 
 8. शिक्षक: बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

  चिन्टु: पान नं. १७ ते ४२.
 9. शिक्षक- झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?

  .
  .
  झंप्या: कारण कुणाला कळायला नको
  कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते….
 10. मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

  इंग्रजीचे सर ओरडले. “व्हाय आर यू लेट?

  “इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता
  आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.

  म्हणून ऊशीर झाला.

  “सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…

  हजरजबाबी मन्याने म्हटले,
  “सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
  काऊज हसबण्ड केम…हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा.
  सो आय कम लेट!

Advertisement

Leave a Reply