Take a fresh look at your lifestyle.

इंधन भडका : आठवडाभरानंतर कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात केली ‘एवढी’ वाढ

दिल्ली :

Advertisement

लॉकडाउनपासून इंधनाच्या दरात सुरू झालेली वाढ अजूनही थांबलेली नाही. एका बाजूला महागाई आणि बहुतांश क्षेत्रातील मंदीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या भारतीयांना इंधन दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान सोमवारी सादर झालेल्या यावर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावण्यात आला होता. तेव्हाच तज्ञांनी इंधन दरवाढ होणार असल्याचे सांगितले होते.   

Advertisement

त्याप्रमाणे आज इंधन दरात वाढ झाली आहे.  सलग सात दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ११ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल २ रुपये ९४ पैशांनी महागले आहे. तर याच कालावधीत झालेल्या डिझेल दरवाढीने डिझेलमध्ये २.९६ रुपयांची वाढ झाली आहे.

Advertisement

मुंबईत आज गुरुवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.२० रुपयांवर गेला आहे. एक लीटर डिझेल ८३.६७ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८६.६५ रुपये झाला असून डिझेलचा भाव ७६.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८९.१३ रुपये असून डिझेल ८२.०४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८८.०१ रुपये असून डिझेल ८०.४१ रुपये झाला आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.५४ रुपये असून डिझेलचा भाव ८१.४४ रुपये आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply