Take a fresh look at your lifestyle.

पवारांनी केलेली टीका फळाला आली; ‘या’ माजी आमदाराला ‘असा’ झाला फायदा

दिल्ली :

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात टीका करून अनेक जिल्हास्तरावरील नेते थेट राज्यस्तरावर जातात. दुय्यम फळीतील नेता हा प्रथम स्तरावरील फळीत जाऊन राजकारण करू लागतो. मोठे होण्यासाठी 2 प्रकारची टीका महत्वाची असते. एकतर तुमच्यावर एखाद्या मोठ्या नेत्याने टीका केली पाहिजे अन्यथा तुम्हीतरी एखाद्या मोठ्या नेत्यावर घनघोर टीका केली पाहिजे. भाजप आणि इतरही पक्षातील अनेक नेते शरद पवारांवर टीका करून मोठे झाले. मात्र आता पवारांनी टीका केल्याने एका माजी आमदाराचे नशीब फळफळले आहे.

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यात पवारांचे जितके जवळचे लोक आहेत. तितकेच विरोधकही आहेत. पवारांवर भरभरून प्रेम करणारा जिल्हा नगरचा आहे कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या बालेकिल्ल्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीचे आमदार नगर जिल्ह्याने दिले. याच नगर जिल्ह्याने एकेकाळी पवारांना कोर्टाची पायरी चढायला लावली होती. काही दिवसांपूर्वी जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर टीका केली. मधल्या काळात भाजपनेही पिचड यांची साथ सोडल्यात जमा होती. दरम्यान आपली साथ सोडून गेल्याचा रागही पवारांच्या मनात होता. त्यामुळे पवारांनी आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठे बळ दिले आणि पिचड यांचा पराभव झाला.

Advertisement

आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमधूनही त्यांना हटवा असे जाहीर आवाहनच पवारांनी अकोले तालुक्यातील लोकांना केले होते. त्यामुळे पवार यांच्याकडून पिचड हे सातत्याने लक्ष्य केले जाणार, हे लक्षात घेत भाजपने पिचडांना पुन्हा बळ देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिचड यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पिचड यांना राष्ट्रीय राजकारणातील पद मिळावे म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply