Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अखेर सुचली प्रशासनाला सुचली उपरती; ठोकलेले खिळे काढण्यास सुरुवात

दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून दहशतवादी व नक्षलवादी यांचे असल्याचे सत्ताधारी भाजपमधील अनेक मंत्र्यांनी म्हटले आहे. अनेकदा पोलिसांच्या हवाल्याने आंदोलनात इतर शक्तींचा हात असल्याच्या संशयाच्या बातम्याही आलेल्या आहेत. परिणामी आंदोलकांना रोखण्यासाठी थेट रस्त्यावर खिळे ठोकण्याचे काम प्रशासनाने केले होते. मात्र, आता तेच खिळे काढण्यास सुरुवात झालेली आहे.

Advertisement

जगभरातून याचे फोटो शेअर केले गेल्याने एकूण सरकार आणि पोलीस यांच्याबद्दल अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अनेक ठिकाणी सिमेंटच्या भिंती उभ्या करतानाच जमिनी खोडून अडथळे निर्माण केले जात होते. सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त असताना खिळ्यावरून चालणे किंवा वाहन चालवणे शक्य होणार नाही अशी परिस्थिती प्रशासनाने केली होती.

Advertisement

ANI on Twitter: “Delhi: Nails that were fixed near barricades at Ghazipur border are being removed. https://t.co/63Xfr6Xwbz” / Twitter

Advertisement

दि. 6 फेब्रुवारीच्या चक्काजाम आंदोलनासह देशभरातून दिल्लीच्या परिसरात हजारो शेतकरी दाखल होत असताना प्रशासनाने ही कार्यवाही केली होती. त्यावर सत्ताधारी भाजपची मंडळी शांत होती. तर, विरोधातील काँग्रेस आणि इतर पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनीही हे फोटो शेअर केले होते. मग जगभरातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. परिणामी हे खिळे काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केल्याची बातमी ANI या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply