Take a fresh look at your lifestyle.

गुंतवणूक ज्ञान : इंडेक्स फंड म्हणजे आणि त्यातील संधी समजून घेण्यासाठी ई वाचा

२०१७ पासून सेन्सेक्स, बीएसईमध्ये जो ३० स्टॉक मार्केट बारोमीटर आहे, या निर्देशांकाने ७६% वृद्धी अनुभवली. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, त्याने दरवर्षी १५% पेक्षा जास्त परतावे दिले आहेत. याच काळात लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंटपेक्षा हे प्रमाण निश्चितच जास्त आहे. थोडक्यात सांगयाचे म्हणजे, हे परतावे काही अग्रगण्य म्युच्युअल फंड्सपेक्षा जास्त आहेत. मग इथे प्रश्न उभा राहतो की आपण इंडेक्स फंडमध्येच गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरणार नाही का? असेल तर ते कसे? याबद्दल सविस्तर सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

Advertisement

इंडेक्स फंड म्हणजे काय ?

Advertisement

नावाप्रमाणेच इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० इत्यादीसारख्या इंडेक्समध्ये केलेली गुंतवणूक होय. ते म्युच्युअल फंडची कामगिरी मोजण्याकरिता त्या संदर्भाने वापरतात म्हणून त्यांना बेंचमार्क निर्देशांकही म्हणतात. त्यामुळे सेगमेंटनुसार म्युच्युअल फंड्सचे बॉरोमीटर असतील तेव्हा एखाद्याने त्यात का गुंतवू नये? याच कल्पनेवर इंडेक्स फंड उभे आहेत. हे फंड्स बाजार निर्देशांकात गुंतवणूक करतात आणि निर्देशांकाच्या सिक्युरिटीजमध्ये समान वाटा मिळवून त्यांच्या परफॉर्मन्सचे अनुकरण करतात.

Advertisement

पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांमध्ये इंडेक्स फंड मागील वर्षात खूप लोकप्रिय झाले. लोअर डाऊनसाइड रिस्कच्या तुलनेत ब्लूचीप स्टॉक्स हे सतत परतावे देतात, हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या म्युच्युअल फंड्सपेक्षा हे अव्यवस्थित फंड्स (उदा. इंडेक्स फंड) उत्तम कामगिरी करतात.

Advertisement

इंडेक्स फंड्स तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणण्यासाठीही मदत करतात. त्यात स्थिरता आणतात. काही अभ्यासांनुसार, विशेषत: लाँग टर्ममध्ये बेंचमार्क निर्देशांक चांगलीच बाजी मारतात. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसवर विश्वासाची समस्या असेल तर तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक इक्विटीत प्रवेश करतानाही याचा विचार करू शकतात.

Advertisement

इंडेक्स फंड्स भारतात लोकप्रिय आहेत का?

Advertisement

इंडेक्स फंड्सना हवी तशी लोकप्रियता मिळालेली नाही. विविध म्युच्युअल फंड घराण्यांनी अनेक इंडेक्स फंड्स काढले आहेत. निर्देशांकात गुंतवणूक करणारे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) देखील अआहेत. तुम्ही बँक निफ्टी तसेच मिडकॅप-स्मॉल कॅप आधारीत निर्देशांक (बीएसई व एनएसई) एक्सचेंज आदी पर्यायही वापरू शकता. पण हे करतानाच त्यातील अस्थिरता आणि जोखीमीचाही विचार केला पाहिजे.

Advertisement

चांगला इंडेक्स फंड कसा शोधायचा?

Advertisement

कोणत्याही इंडेक्स फंडच्या कामगिरीचा अंदाज हा त्या इंडेक्सने दिलेल्या परताव्यांच्या आधारे काढता येतो. ट्रॅकिंग एरर- जी बेंचमार्क निर्देशांकातून फंडाच्या स्थानाचे विचलन प्रतिबिंबीत करते. ते निश्चित करण्यासही मदत करते. लोअर ट्रॅकिंग एरर असलेल्या इंडेक्स फंडाकडेच आपण आदर्श म्हणून पाहिले पाहिजे.

Advertisement

यासह, उपरोक्त फायद्यांव्यतिरिक्त, इंडेक्स फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे काही अतिरिक्त फायदे पुढीलप्रमाणे:

Advertisement

१. हे कमी जोखिमीचे व गुंतवणुकीसाठी कमी किंमतीचे असतात. सक्रियपणे व्यवस्थापित निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी आहे.

Advertisement

२. लाँग-टर्म गुंतवणुकीत यातून उत्तम परिणाम मिळतात.

Advertisement

इतिहास पाहिला असता, इंडेक्स फंड्सनी सक्रियपणे व्यवस्थापित फंड्सच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

Advertisement

इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची?

Advertisement

अग्रेसर म्युच्युअल फंड घराण्यांनी जारी केलेले इंडेक्स फंड आणि ईटीएफ तुम्ही तपासू शकता. सर्वात चांगल्या परताव्यासाठी आपल्या इंडेक्स फंडाने घेतलेल्या सगळ्या शुल्काकडे विशेष लक्ष द्या. यापैकी काही शुल्कांमध्ये एक्झिट लोड, मॅनेजमेंट फी इत्यादींचा समावेश होतो. इंडेक्स खरेदी करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच आणखी पर्याय म्हणजे, ग्रो, पेटीएम मनी, ईटी मनी इत्यादी ऑनलाइन म्युच्युअल फंडांच्या मदतीनेही तुम्ही तुमचे पैसे ईटीएफमध्ये गुंतवू शकता. ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे नोंदणीकृत ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply