लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ आणण्याची घोषणा करतानाच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन बँका आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याचे नाव जाहीर केले नव्हते. त्यावर नवभारत टाईम्स वृत्तपत्राने बातमी दिली आहे. त्यानुसार खासगीकरण प्रक्रियेत आता न्यू इंडिया एश्योरंस कंपनीचा नंबर लागला आहे.
ही कंपनी १९१९ मध्ये स्थापन झाली होती. दोराबजी टाटा यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे विम्याचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर सरकारने तिच्यावर ताबा मिळवला. ही एक सुस्थितीत चाललेली सरकारी विमा कंपनी आहे. B ++ Stable FSR आणि bbb + Stable ICR असे तिचे रेटिंग आहे. २०१४ पासून CRISIL ने त्यांना AAA / Stable हे रेटिंग दिलेले आहे.
मागील आर्थिक वर्षातही कंपनीने २९,७१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे. एकूणच जगभरात दखलपात्र अशी ही कंपनी आहे. मात्र, असे असतानाही मग या चांगल्या कंपनीचे खासगीकरण नेमके का केले जाणार आहे याचेच कोडे सर्वांना पडलेले आहे. अनेकांना वाटते की, याद्वारे चांगले पैसे मिळवून देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी तो पैसा खर्च करण्याची भारत सरकारची योजना आहे. तर, काहींना हा खासगी भांडवलदार मंडळींच्या दबावाचा परिपाक वाटत आहे.
यापैकी कोणतेही कारण असोत, न्यू इंडिया एश्योरंस ही विमा क्षेत्रातील एक चांगली कंपनी आहे. त्यामुळे याच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेतून सरकारला चांगले पैसे मिळतील असेच चित्र आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मोठी बातमी…. ‘भारत बंद’ आंदोलनात पडली फुट; ‘त्या’ संघटनेने अशी घेतली भूमिका
- तब्बल ‘एवढे’ व्यापारी देणार भारत बंदची हाक; वाचा, काय असणार सुरू आणि कशाला असेल टाळे
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित