Take a fresh look at your lifestyle.

‘तो’सुद्धा तिरंग्याचा अपमान; वाचा, शिवसेनेने सांगितलाय कोणता प्रसंग

दिल्ली :

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज ‘तिरंग्याचा अपमान’ या विषयावर भाष्य करत भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

Advertisement

लाल किल्ल्यावर शेतकऱयांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. ’26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सवाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो. सीमेवर तैनात सुरक्षा दलाचे बजेट या वर्षी 7.1 टक्क्यांनी वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलासाठी नव्या अर्थसंकल्पात 1 लाख तीन हजार 803.52 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली, ती फक्त तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱयांना प्यारा आहे.

Advertisement

तिरंगा अपमानित करून

Advertisement

कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे. शेतकऱयांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱयांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱयांची पोरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात? निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत? शेतकऱयांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱयांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply