Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ सुप्रसिद्ध कंपनीच्या बनावट ब्युटी क्रीम बाजारात; ‘तिथल्या’ ३ दुकानदारांवर कारवाई

नटायला आणि मुरडायला फ़क़्त महिलांना नाही, तर पुरुषांनाही आवडते. मात्र, त्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मग सुप्रसिद्ध कंपन्यांच्या बनावट सौंदर्यप्रसाधने विक्रीचा गोरखधंदा काहींनी सुरू केल्याचे उघड झालेले आहे.

Advertisement

याप्रकरणी हिमाचल प्रदेश राज्यातील सोलन जिल्ह्यातील तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्या दुकानदारांकडे लैक्मे कंपनीच्या बनावट ब्युटी क्रीम आणि इतरही अनेक सौंदर्यप्रसाधने विकले जात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

सुंदर दिसण्यासाठी महिला व पुरुष महागडी क्रिम लावण्याची तयारी ठेऊन असतात. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यात लैक्मे या नामांकित कंपनीची क्रीम बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. बनावट कॉस्मेटिक क्रीम विक्रीसाठी तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडून आलेल्या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

ADVT.> ब्युटी प्रोडक्टवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत सूट.. क्लिक करून ऑफर पहा व खरेदी करा.. https://amzn.to/3pHOw4Q

Advertisement

कंपनीच्या अधिकाऱ्यासह पोलिसही त्यावेळी उपस्थित होते. पोलिस व कंपनीच्या अधिकाऱ्यानी दुकानांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या कंपनीचा सर्व बनावट माल पोलिसांकडे जप्त केले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement

याबाबत कंपनीचे कायदेशीर वकील नान तारा म्हणाले की, सोलनमधील काही दुकानदार लैक्मे कंपनीचा बनावट माल विकत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सोलन आणि काही दुकानांमध्ये सर्वेक्षण केले असता त्यांना बनावट वस्तू आढळल्या. त्यानुसार त्यांनी पोलिसांत तक्रार केली. छाप्यात लॅक्मे कंपनीचा मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त केला आहे. यात बर्‍याच महागड्या क्रिमचा समावेश आहे. पाइरेसी कायद्यांतर्गत याप्रकरणी कारवाई केली जात आहे. बनावट माल कुठून आला याबाबत आरोपी दुकानदारांकडून विचारपूस करीत आहेत.

Advertisement

संपादन : माधुरी मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply