Take a fresh look at your lifestyle.

अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये : अखेर टाटांकडून घेतलेल्या ‘त्या’ दोन्ही कंपन्यांचे खासगीकरण..!

यंदाचा अर्थसंकल्प हा मागील 100 वर्षातील सर्वोत्तम असल्याचे सर्टिफिकेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध गायिका आणि बँकर अमृताताई यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर विरोधकांनी या बजेटला ‘ओएलएक्स बटेज’ म्हटलेले आहे. याच बजेटमध्ये आणखीही एक वैशिष्ट्ये आहे. ते म्हणजे एकेकाळी टाटा ग्रुपकडून ताब्यात घेतलेल्या दोन कंपन्यांचे खासगीकरण.

Advertisement

विमा आणि हवाई क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या उद्देशाने कोणे एकेकाळी भारत सरकारने टाटांची न्यू इंडिया एश्योरंस आणि टाटा एअरलाईन्स सरकारच्या ताब्यात घेतली होती. मात्र, काळाची चक्रे फिरली आणि आता याच बलाढ्य बनलेल्या कंपन्यांची विक्री करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला घ्यावा लागला आहे.

Advertisement

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दणक्यात कंपन्या विक्री व सरकारी कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. याद्वारे तब्बल 1 लाख 75 हजार कोटी रुपये सरकार उभे करणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. नव्हे ती रसातळाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची देशाला गरज आहे.

Advertisement

देशाच्या हितासाठी दोन बँका, एक विमा कंपनी आणि एअर इंडिया या कंपन्यांची विक्री केली जाणार आहे. त्यातील दोन कंपन्या टाटा ग्रुपच्या ताब्यातून घेतलेल्या होती. पहिली म्हणजे न्यू इंडिया एश्योरंस आणि दुसरी एअर इंडिया. या दोन्ही कंपन्यांना विक्री करताना कोण कंपन्या खरेदीसाठी पुढे येतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

न्यू इंडिया एश्योरंस कंपनी १९१९ मध्ये स्थापन झाली होती. दोराबजी टाटा यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे विम्याचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर सरकारने तिच्यावर ताबा मिळवला. ही एक सुस्थितीत चाललेली सरकारी विमा कंपनी आहे. B ++ Stable FSR आणि bbb + Stable ICR  असे तिचे रेटिंग आहे. २०१४ पासून CRISIL ने त्यांना AAA / Stable हे रेटिंग दिलेले आहे.

Advertisement

जे. आर. डी. टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स स्थापन केली होती. पुढे १९५३ मध्ये ही कंपनी ताब्यात घेऊन तिचे नाव एअर इंडिया करण्यात आले. सन २००० नंतर एअर इंडियाचा वाईट काळ सुरू झाला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २०११ मध्ये या कंपनीत तोट्यात गेलेल्या इंडियन एअरलाईन्स कंपनीचे विलीनिकाना केले आणि मग अखेरीस एअर इंडिया विकण्याचा निर्णय आता घेण्याची वेळ आलेली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply