Take a fresh look at your lifestyle.

भयंकरच की.. ‘त्या’ दिवशीच्या घटनेनंतर 70 शेतकरी तुरुंगात, तर 14 थेट गायब..!

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शेतकरी आंदोलनात काही हिंसक घडामोडी घडल्या. आंदोलक, पोलीस, सरकार आणि विरोधी राजकीय पक्ष यांनी याप्रकरणी एकमेकांना जबाबदार धरले आहे. त्यातच 300 पोलीस त्या दुर्दैवी घटनेत जखमी झाल्याच्या बातम्याही आल्या. मात्र, शेतकरी आंदोलक जखमी झाले किंवा नाही यावर कोणीही बोललेले नाही.

Advertisement

मात्र, आता सुमारे दहा दिवस होत आल्यावर त्या दुर्दैवी हिंसक घटनेनंतर पंजाबी शेतकरी तुरुंगात किंवा गायब झाल्याच्या बातम्यांना वाचा फुटण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या घटनेनंतर तब्बल 70 जण तुरुंगात असून, 14 जणांचा काहीही थांगपत्ता लागू शकलेला नाही.

Advertisement

ANI on Twitter: “Chairing an All Party Meeting in Punjab Bhawan on the issue of Central Farmer Legislations and the way forward: Punjab CM Captain Amarinder Singh https://t.co/1S2QYKYEme” / Twitter

Advertisement

पंजाबचे कॅबिनेट मंत्री सुखजिंदरसिंग रंधावा, सुखबिंदरसिंग सरकारिया, खासदार मनीष तिवारी आणि आमदार डॉ. राजकुमार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री रंधावा आणि सरकारिया यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या पंजाबी शेतकर्‍यांवरील खटले लढण्यासाठी 40 वकिलांची एक टीम तयार केली आहे. वकिलांची ही टीम अटक केलेल्या शेतकर्‍यांशी, तरूणांशी आणि त्यांच्या पालकांशी बोलणी संवाद साधणार आहे. अगदी कोणत्याही शुल्काविना त्यांचे खटले लढवले जाणार आहेत.

Advertisement

गृहमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत अटक केलेल्या व्यक्तींविषयी नरम दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन पंजाबच्या मंत्रिगटाने केले आहे. यावर अमित शहा म्हणाले आहेत की, केंद्र सरकार चर्चेसाठी सज्ज आहे आणि शेतकऱ्यांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply