Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारचा ‘तोही’ इंतजाम; पहा नेमके काय केलेय त्याचे 7 मुद्दे

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे लावून त्यांना भंडावून सोडल्याची बातमी येत आहे. अशावेळी मग 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन जाहीर केल्याने प्रशासनाने त्यांच्यावर कडी करण्यासाठी कार्यवाही केली आहे.

Advertisement

आंदोलकांना रोखण्यासाठी केलेली कार्यवाही अशी :

Advertisement

1 ) प्रमुख तीन ठिकाणी देशभरातून आंदोलक शेतकरी एकत्र होण्यास पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. त्यांच्या गाड्या येऊ न देण्यासाठी गाड्यांच्या हवा सोडण्याची सोय केली जात आहे.

Advertisement

2 ) पायी येणाऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारेचे कुंपण आणखी वाढवण्यात येत आहे.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “GOI, Build bridges, not walls! https://t.co/C7gXKsUJAi” / Twitter

Advertisement

3 ) पोलीस व अर्धसैनिक बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात आणखी मोठी वाढ केली जात आहे. डीजे लावून शेतकऱ्यांना एकमेकांशी बोलता येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

Advertisement

4 ) काही ठिकाणी तर चक्क रस्त्यांवर खिळे ठोकले गेले आहेत. आंदोलकांच्या गाड्या पुढे न जाता पंक्चर करण्याची ही खास सोय आहे.

Advertisement

5 ) आंदोलनात उपद्रव केलेल्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी स्टीलच्या काठी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत.

Advertisement

6 ) प्रमुख रस्त्यांवरून आंदोलक येणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी अनेक ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा उभा करतानाच मोठमोठे अडथळे उभे केलेले आहेत.

Advertisement

7 ) ठिकठिकाणी रोड ब्लॉक करण्यात आलेले आहेत. एकूणच आंदोलकांची संख्या वाढणार नाही व वाढली तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल असे नियोजन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply