Take a fresh look at your lifestyle.

टिकेतांनी दिला महत्वाचा संदेश; फोटो होत आहे जोरात व्हायरल

दिल्ली :

Advertisement

कोणतेही आंदोलन एकदा कमजोर पडून पुन्हा पेटले तर नेत्यांचे मनोधैर्य आणखी वाढते. सध्या राकेश टिकैत यांच्या आताच्या एकूण कृतीतून तेच स्पष्ट होत आहे. त्याचा असाच तेवरमधला फोटो जोरात व्हायरल होत आहे.

Advertisement

सध्या पोलिसांनी आंदोलकांची चहूबाजूंनी कोंडी केली आहे. सोशल मिडीयामध्ये आंदोलक म्हणजे दहशतवादी असा सूर आहे. अशावेळी पोलिसांच्या पाणीबाणी आणि जोरात डीजे वाजवण्याचा आंदोलकांनी निषेध केला आहे. तसेच 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन जाहीर केले आहे.

Advertisement

अशावेळी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. अशावेळी समूहाने आढळले तरी पोलीस कारवाई करू शकतात. मात्र, असाच बोर्ड लावलेल्या एका ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकैत जेवण करत आहेत. ते तिथे एकटेच आहेत. त्यामुळे कायद्याचा भंग होत नाही. मात्र, अशा पद्धतीने त्यांनी सरकारला आव्हान दिल्याचे प्रतीत होत आहे.

Advertisement

टिकैत यांनी म्हटले आहे की, शेतकरी आंदोलन थेट ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालवण्याचे आता शेतकऱ्यांचे नियोजन आहे. सरकारी यंत्रणा आंदोलकांना रोटीबंदी करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवर सिमेंटच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी पोलिसांनी चक्क खिळे लावून आंदोलकांच्या गाड्या पंक्चर करण्याची सोय केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply