कोणत्याही क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आता महिला सरसावल्या आहेत. अर्थात त्यांचा हेतू मक्तेदारी मोडीत काढण्याचा नसून फ़क़्त आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळावा हाच आहे. मात्र, तोही आता पुरुषांच्या पोटात गोळा आणणारा आहे.
अशीच एक घटना घडल्याने पुरुषांना महिलांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाचे दार ठोठावे लागले आहे. हिमाचल प्रदेशात निवडणूक आयाेगाला पुरुष राजकारण्यांच्या विचित्र स्वरूपाच्या तक्रारी मिळू लागल्या आहेत. देहरा येथील एकाने माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत तक्रार दिली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असताना त्या खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवू लागल्या आहेत. मग पुरुषांनी जायचे तरी कुठे, असे गाऱ्हाणे यात मांडण्यात आले आहे. परंतु ही बाब माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नाही, असे सांगून आयाेगाने उत्तर देण्यास नकार दिला आहे.
एखाद्या व्यक्तीला पंचायत किंवा स्थानिक निवडणुकीसंबंधी एखादी तक्रार असल्यास ते आयाेगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकतात. मात्र, आता अशा पद्धतीने महिलांच्या वाढत्या उमेदवारीने वैतागून तक्रारी येण्यास सुरुवात झाल्याने निवडणूक आयोगातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अर्थात या अर्जाचे पुढे काहीही होऊ शकत नाही. कारण, सर्वसाधारण अर्थात खुली जागा ही सर्वांसाठी खुली असते.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर
- म्हणून मोदी सरकार कृषी विधेयकावर आहे ठाम; पहा नेमके काय म्हटलेय मंत्र्यांनी