Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : सरकारचा बंदोबस्त चोख; पण राहुल गांधींचा ‘त्याकडे’ रोख..!

दिल्ली :

Advertisement

सध्या देशात दोन गट पडलेले आहेत. एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकाबाबत शेतकरी आंदोलकांवर आगपाखड करणारा. तर, दुसरा आहे आंदोलनाबाबत सहानुभूती दाखवणारा. मात्र, सरकारच्या शिलेदारांनी अगोदरच आंदोलक हे दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. अशावेळी आता पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

Advertisement

सध्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या आंदोलन परिसरात जोरात डीजे वाजवले जात आहेत. त्यावरून देशभक्तीचे गाणे वाजवले जातात. त्यामुळे एकमेकांशी बोलताना अडचणी येऊन डोके दुखत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

Advertisement

हेच रोखताना आणखी आंदोलक एकत्र येणार नाहीत याच्या काळजीपोटी सरकारने आता अनेक ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच काटेरी तारा लावल्या आहेत. काही ठिकाणी नव्या स्टीलच्या काठ्या मागवण्यात आलेल्या असून रस्त्यांवर खिळे ठोकले जात असल्याच्या बातम्या आहेत.

Advertisement

त्यातच राहुल गांधी यांनी चार फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्ताबाबत म्हटले आहे की, आता फ़क़्त अडथळे नाही तर थेट मोठे पूल (ब्रिज) उभारले जात आहेत. एकूणच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा आणखी कठोर होत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांचा मात्र त्यास आक्षेप आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply