Take a fresh look at your lifestyle.

शेअर मार्केट अपडेट : म्हणून आजच्या बाजारात तेजीचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आत्मनिर्भर बजेटवर शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचवेळी जागतिक बाजारात आजच्या दिवशी तेजीचा ट्रेंड आहे. त्यामुळे भारतीय बाजारातही आज असेच संकेत आहेत.

Advertisement

बाजाराच्या कालच्या तेजीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6.8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आज अमेरिकन आणि आशियाई बाजाराकडून तेजीचे संकेत आहेत. डाऊन फ्युचर्समध्ये सुमारे अर्ध्या टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशावेळी मग भारतीय बाजारात कालच्या तेजीसह आजची वेगळी झलक एकत्रित दिसल्यास निर्देशांक उसळी घेतील असेच म्हटले जात आहे.

Advertisement

1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारावर कमालीचे सकारात्मक वारे वाहिले. सतत 6 दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी बाजारात खरेदी दिसली. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारने अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. इन्फ्रा आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देतानाच ग्रामीण क्षेत्रामध्येही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Advertisement

अशावेळी रोजगार निर्मितीच्या उपाययोजना बजेटमध्ये दिसून आल्याने तरुणाई व मध्यमवर्गीय याचे स्वागत करीत आहेत. परिणामी बाजारात तेजी राहील असे संकेत फायनांसिअल एक्स्प्रेसच्या बातमीत दिलेले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply