Take a fresh look at your lifestyle.

पाच टिप्स तुमच्या ड्रीम कारसाठी; कारण मुद्दा आहे मायलेजचा न पैशांचा

सध्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे पेट्रोल व डीझेल यांच्या वाढत्या किमतीचा. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन वापरण्याच्या आपल्या रोजच्या सवयीवर आणि खिशावर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत अशा पाच ट्रिक्स की ज्यामुळे आपले पैसे तर वाचतील पण अर्थभार कमी होतानाच ड्रीम कार आणखी झकास राहील व तिची लाईफ वाढेल.

Advertisement

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, यातील पहिला मुद्दा म्हणजे आपण गाडी योग्य स्पीडवर चालवावी. कारण, जितका जास्त स्पीड तितके आपली कार इंधन जास्त पिणार. आपण कितीही कम पिती है सांगणाऱ्या जाहिराती पहिल्या तरी आपल्या वाहनाची पिण्याची क्षमता हाच आपल्या सर्वांचा डोकेदुखीचा मुद्दा आहेच की. म्हणून जास्त स्पीड म्हणजे जास्त इंधन खर्च हे लक्षात घेऊन गाडी वापरावी.

Advertisement

दुसरा मुद्दा आहे सर्विसिंग. होय, वेळेत किंवा वेळेवर सर्विसिंग करण्याची सवय ठेवा. त्यासाठीचे वेळापत्रक पाळा. यामुळे मायलेज तर वाढेल शिवाय आपल्या गाडीची देखभाल राहून वेळेत दुरुस्ती होत राहिल्याने गाडीचे आयुष्य वाढेल.

Advertisement

ADVT.> ‘टाटा क्लिक’वर खरेदी करा आणि 50 % सूट व बाय 2 गेट 1 फ्री ऑफर मिळावा : https://tracking.vcommission.com/SHJ4H

Advertisement

तिसरा मुद्दा आहे गाडीच्या टायरमधील हवेचा. योग्य क्षमतेने गाडीच्या टायरात हवा असावी. जास्त हवा ठेऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे कंपनीने सांगितल्यानुसार आणि आपला मॅकॅनिक जो सल्ला देईल त्यानुसार हवेचे नियोजन करावे. यामुळे सुमारे ३ टक्के इतकी इंधन बचत होऊ शकते.

Advertisement

कराचे एअर फिल्टर हा चौथा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे फिल्टर जास्त होऊन आपली गाडी जादा इंधन पिनेवाली होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी वेळोवेळी मॅकॅनिकची मदत घ्या.

Advertisement

आणि पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या गाडीचे ब्रेक आणि अक्सिलेटर योग्य क्षमतेने आणि दाबाने काम करीत असल्याकडे नियमित लक्ष द्या. शहरातून व गर्दीच्या ठिकाणाहून गाडी चालवताना आपण योग्य काळजी घ्यावी. अशावेळी अक्सिलेटर डार..डूर.. करून आणि धूर काढून आपण जास्त इंधन खर्च करत असतो याकडे लक्ष ठेवावे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply