Take a fresh look at your lifestyle.

IMP : म्हणून टाटांच्या ताब्यातून घेतलेली ‘ती’ कंपनी सरकारने काढलीच विक्रीला..!

सरकारी कामकाज ज्या पद्धतीने भ्रष्टाचारयुक्त असते. त्याच पद्धतीने सरकारच्या ताब्यातील बहुतांश कंपन्याही त्याच पद्धतीने चालवल्या जातात. त्याचाच मोठा फटका अनेक सुस्थितीत असलेल्या कंपन्यांना बसला आहे. त्यातील एक दिग्गज आणि एकेकाळी टाटा ग्रुपच्या ताब्यातून सरकारजमा केलेली कंपनी विकण्याची नामुष्की त्यामुळेच भारत सरकारवर ओढवली आहे. त्या कंपनीचे नाव आहे ‘एअर इंडिया’.

Advertisement

२०११ पूर्वी देशात सरकारच्या दोन कंपन्या होत्या, ज्या हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत होत्या. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या होत्या. त्यातील इंडियन एअरलाईन्स या डबघाईला आलेल्या कंपनीचे लोढणे अखेर २०११ मध्ये एअर इंडिया कंपनीच्या गळ्यात बांधण्यात आले. परिणामी आता भ्रष्टाचार आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे आता एअर इंडिया कंपनी विकण्याची वेळ सरकारवर आलेली आहे.

Advertisement

सरकारी हवाई वाहतूक सेवा ‘एअर इंडिया’ कंपनी खासगी कंपन्यांना देण्याची महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला कोरोना यांनी केली आहे. ६० हजार कोटींचे कर्ज एअर इंडियावर असल्यामुळे कंपनीच्या विक्रीचा निर्णय होण्याची शक्यता होतीच. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर सभागृहात विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement

१९३२ मध्ये एअर इंडियाची स्थापना झाली. उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी स्थापन केलेल्या एअरलाईन्सचे सुरुवातीचे नाव ‘टाटा एअरलाईन्स’ होते. त्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने टाटा एअरलाईन्सचे राष्ट्रीयकरण केले. १९५३ मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. त्यावेळी तिचे नावही बदलण्यात आले होते.

Advertisement

२००० नंतर आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांचे अत्याधुनिकीकरण करण्यात एअर इंडिया कमी पडली. २००४ मध्येही एअर इंडियाकडून बी ७४७ आणि ए ३१० विमानांचा वापर सुरू होता. कित्येक दशके कंपनी हीच विमाने वापरत होती. याशिवाय एअर इंडियाला भ्रष्टाचार आणि ढिसाळ व्यवस्थापन यांचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. पुढे इंडियन एअरलायन्स ही कंपनी २०११ मध्ये यात विलीनीकरण केल्यावर खऱ्या अर्थाने ‘एअर इंडिया’चे बुरे दिन गतिमान झाले. अखेरी आता ही कंपनी पुन्हा खासगी होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply