Take a fresh look at your lifestyle.

BUDGET 2021 : म्हणून अर्थमंत्री ‘वही-खाता’बुक घेऊन आल्यात लाल रंगाच्या साडीत..!

आज देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. यापूर्वी ब्रीफकेसमधून बजेटची कागदपत्रे संसदेत आणली जायची. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वही-खाता असे त्यास नाव देऊन मागील वर्षी ‘क्रांतिकारी’ बजेट सादर केले होते. यंदाच्या त्या ‘वही-खाता’बुक लाल साडीमध्ये देशाच्या समोर घेऊन आलेल्या आहेत.

Advertisement

मागील वर्षीच्या क्रांतिकारी बजेटनंतर आलेल्या करोना विषाणूने देशाच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लावली. जगभरात नीचांकी अर्थव्यवस्था वृद्धीदर नोंदवण्याची किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नोंदवली गेल्याची टीका होत आहे. अशावेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी देशाचे लक्ष लाल साडीने वेधले आहे.

Advertisement

सीतारमण यांना क्लासी हँडलूम आणि सिल्क साड्यांची आवड असून त्यांनी बजेटवेळी लाल आणि क्रीम रंगाची साडी यासह सोन्याची चेन, बांगड्या आणि कानातले असा साध्या लूकमध्ये वही-खाता आणले आहेत. लाल रंग हा प्रेम, ऊर्जा, शक्ती यांचे प्रतीक मानला जातो. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाच्या साडीची निवड केल्याचे अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्र आणि माध्यम संस्थांनी म्हटले आहे.

Advertisement

ता.क. : त्यांच्या या लुकची बातमी जोरात आहे. एकूणच बजेटमध्ये कोणत्या घोषणा होणार आणि यापूर्वीच्या घोषणांचे काय झाले, याकडे कोणाचेही लक्ष नसून इंव्हेंट कसा गाजवला जाते याचेच कौतुक असल्याने आम्ही ही अत्यंत महत्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply