Take a fresh look at your lifestyle.

BUDGET 2021 : मोदींची फ़क़्त पोकळ घोषणाबाजी; अर्थतज्ञ डॉ. मुणगेकर यांची खरमरीत टीका

मुंबई :

Advertisement

देशाच्या अर्थाक्षेत्राची गती मंदावली असून अशावेळी देशात काहीही ठोस काम न होता पोकळ घोषणाबाजी सुरू असल्याचे मत अनेकजण व्यक्त करीत असतात. तोच धागा पकडून आता ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून टीका केला केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, नोटाबंदीपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली आहे. या घसरणीला मोदी सरकार जबाबदार आहे. मोदी सरकार म्हणजे केवळ घोषणांच्या बळावर जगलेले हिंदुस्थानच्या इतिहासातील एकमेव सरकार आहे. व्यावसायिक मंडळी आणि रोजगाराच्या वृद्धीचे आकडे याकडे आता सर्वजण लक्ष वेधून मोदी सरकारचे अपयश सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशावेळी डॉ. मुणगेकर यांनी ही खरमरीत टीका केली आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पात काय असेल या प्रश्नावर त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल अशी कोणतीही ठोस तरतूद असण्याची शक्यता नसल्याचे दिसते. सलग तीन वर्षे आर्थिक वृद्धीचा दर उणे असणारा हिंदुस्थान हा एकमेव देश आहे. देशाची क्रयशक्ती वाढण्यासाठीही सरकारने काहीही केलेले नसून मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अजिबात गंभीर नाही.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply