Take a fresh look at your lifestyle.

बजेट 2021 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी केल्या ‘या’ 6 महत्वाच्या घोषणा; वाचा, ऑटो आणि आरोग्य धोरणात काय बदल केलेत ते

दिल्ली :

Advertisement

अर्थमंत्री म्हणाले की, आमचे बजेट 6 स्तंभावर अवलंबून आहे. कोरोना काळात सरकारने जीडीपीच्या 13 टक्के इतके आत्मनिर्भर पॅकेज दिले. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण आत्मनिर्भर भारतावर भर दिला पाहिजे.

Advertisement

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोना कालावधीत आरबीआयने 27 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. आपण लॉकडाउन केला नसता जास्त प्राण गेले असते. सरकारने शेतक’्यांच्या खात्यावर पैसे पाठविले आहेत. 80 कोटी लोकांना मोफत रेशन वाटप करण्यात आले. कोरोना काळात 5 मिनी बजेट सादर केले गेले.

Advertisement

दशकातील हे पहिले बजेट आहे. हे डिजिटल बजेट आहे. हे आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यावर भर देईल, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

Advertisement
  1. अर्थमंत्र्यांनी 64,180 कोटी रुपयांची आरोग्य योजना जाहीर केली. सर्व राज्यांचा आरोग्य डेटा बेस तयार केला जाईल. अनुसंधान, विकास आणि नाविन्य यावर लक्ष केंद्रित केले आहे.
  2. अर्थमंत्र्यांनी 17 नवीन हेल्थ इमरजेंसी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली.
  3. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नागरी जलजीवनासाठी 2.87 लाख कोटींची घोषणा केली.
  4. अर्थमंत्र्यांनी वाहन क्षेत्रासाठी वॉलेंटरी स्क्रैपिंग पॉलिसी जाहीर केली.
  5. लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची घोषणा केली.
  6. अर्थमंत्र्यांनी आरोग्य अर्थसंकल्प 94 हजार कोटींवरून 2.38 लाख कोटी रुपयांवर नेण्याची घोषणा केली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply