दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या बजेटमध्ये प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्यात आला आहे. शेतकरी, कामगार, तरुण ते महिला या सर्वांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल. त्याचबरोबर या बजेटमध्ये सर्वसामान्यांवर कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही.
बजेटविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, ग्रोथसाठी नव्या संकल्पनांचा विस्तार करायचा, तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करायची, मानव संसाधनासाठी काम करायची, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी नवनव्या क्षेत्रांना विकसित करणं, आधुनिकताच्या दिशेला पुढे चालायचं, नव्या सुधारणा आणायचं, हे या बजेटचे सिद्धांत आहेत.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट