Take a fresh look at your lifestyle.

भारत महासत्ता होण्यासाठी बजेटमुळे चालना; पहा नेमके काय म्हटलेय राणेंनी

मुंबई :

Advertisement

देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.

Advertisement

राणे यांनी म्हटले आहे की, सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. तसेच, देशाला आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारा हा समतोल आणि देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply