Take a fresh look at your lifestyle.

..तर वीज कर्मचाऱ्यांना झोडपून काढणार; शेतकरी संघटनेने दिला कायद्याचा महत्वाचा दाखला

अहमदनगर :

Advertisement

महावितरण कंपनीच्या आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनात आले की, शेतीसाठी असलेल्या विजेची जोडणी तोडली जाते. मुळात अशा पद्धतीने नोटीस न देता वीजजोड तोडणे हेच बेकायदेशीर असल्याने यापुढे असे केल्यास शेतकरी अधिकारी-कर्मचाऱ्यांना झोडपून काढतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

Advertisement

शेतकरी संघटनेचे युवा आघाड़ी जिल्हाध्यक्ष बच्चू बाबासाहेब मोढवे यांनी याबाबत म्हटले आहे की, शेतीपपांचा व इतर वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज कायदा कलम ५६ नुसार नोटीस देणे बंधनकारक आहे. वीज वितरण कंपनी अर्थात महावितरण कंपनी अशी थकबाकी वसुलीसाठी जर २००३ चा कायदा पायदळी तुडवत असेल, तर शेतकरी संघटना कायदा हातात घेण्यास तयार आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन ५६/१ ची नोटिस न देता खंडित केले, तर संबंधित अधिकाऱ्यास शेतकरी संघटना स्टाईलने आसुडाने झोडपून काढले जाईल.
सध्या रब्बी हंगाम जोमात आहे. अशावेळी पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असते. मात्र, त्याचवेळी  महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू आहे. कंपनी कोणतीही नोटिस न देता थकबाकी वसुलीसाठी कृषिपंाचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे मोढवे यांनी याकडे लक्ष वेधताना कंपनीला कायद्याचे भान येण्याची गरज व्यक्त केली आहे.

Advertisement

सध्या कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वीज कनेक्शन तोडल्यामुळे सुकून जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड जात आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा सुरू ठेवणे आवश्यक आहे. कृषिपंपाच वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी महावितरणने शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोटीस द्यावी, अन्यथा शेतकरी संघटना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोढवे यांनी दिला आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply