Take a fresh look at your lifestyle.

‘त्यां’ची होणार दणक्यात विक्री; पहा अर्थमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे

दिल्ली :

Advertisement

यंदाचे बजेट हे ओएलक्स बजेट म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. कारण, देशाच्या विकासाला गती देण्याच्या ‘उदात्त’ उद्देशाने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनेक सरकारी कंपन्या आणि संस्था विक्रीची घोषणा केली आहे.

Advertisement

यावर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी उभारण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. आगामी आर्थिक वर्षात बीपीसील (BPCL), एअर इंडिया, कॉनकोर आणि एससीआय यांच्या निर्गुंतवणुवर शिक्कामोर्तब होत त्यांच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Advertisement

कोरोना संकटामुळे निर्गुंतवणुकीचा आकडा फक्त 30 ते 40 हजार कोटींपर्यंत पोहचला आहे. हा आकडा गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी आहे. अशावेळी विमा क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या एलआयसीचा आयपीओ आणण्याची सरकारची योजना आहे. 

Advertisement

या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे सरकारला 17,958 कोटी रुपये मिळाले आहे. निर्धारित लक्ष्याच्या ते फक्त 8.5 टक्केच आहे. तसेच सरकारने विदेश संचार निगम लिमिटेडची 26.12 टक्के भागीदारी टाटा कम्युनिकेशन्सला दिली आहे. त्यातून सरकारला या आर्थिक वर्षात 8 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply